M Marathi Live On Date

हाटकेश परिसरातील उदयोग इंडस्ट्री वर महापालिका प्रशासनाने कारवाई करत असताना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला विरोध.. मीरा भाईंदर महापालिकेची सध्या मीरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकाम वर जोरदार कारवाई असतानाच आज मीरा रोड परिसरातील हाटकेश परिसरातील उद्योग इंडस्ट्री कारवाई करण्यासाठी गेले असता शिवसेनेने विरोध केला…आमदार प्रताप सरनाईक सह शेकडो शिवसैनिक यांनी सुरू असलेली कारवाई थांबवली… या वेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर केला की आर.एन.ए. बिल्डरकडून सुपारी घेऊन जर बिल्डरला रस्त्या देण्यासाठी इंडस्ट्री तोडून असतील तर ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही, बांगड्या भरल्या नाहीत आज रस्त्यावर उतरलो उद्या घरात घुसू…असा इशारा दिला…. महेंद्र वानखेडे (प्रतिनिधी)