एक अनोखे गाव जेथे गावकरी करतात वाघाची पुजा”

Spread the love

सोमनाथ पवार

वाघ… वाघ म्हटले की चांगल्या चांगल्यांची बोलती बंद होते.
पण महाराष्ट्रात असेही एक गाव आहे की या गावची माणसं वाघाची पूजा करतात. दरवर्षी या गावात वाघाचा यात्रा उत्सव साजरा केला जातो.

बोलठाण हे गाव नाशिक जिल्ह्याच्या अगदी पूर्वेला आणि औरंगाबाद जिल्हा, जळगाव जिल्हा या तीनही जिल्ह्याच्या सीमेवरील या गावात ग्रामस्थ या वाघोबाची पूजा करतात.

दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंतीच्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते. सर्वप्रथम वाघोबा मंदिरापासून वाघोबाची मिरवणूक वाजत गाजत निघते व दत्त मंदिराजवळ पोहोचल्यानंतर वाघोबा व दत्त महाराज यांची भेट होऊन संपूर्ण गावात शोभायात्रा काढली जाते. या मिरवणुकीत गावकरी महिला पुरुष उत्स्फूर्त सहभाग घेतात. शाळकरी मुले लेझीम संचलन करतात. वेगवेगळे वेशभूषा केलेले तरुण सुद्धा या शोभायात्रेत सहभागी असतात.
साधारणपणे आठ ते दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी औरंगाबाद जळगाव नाशिक जिल्ह्यांतून व संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक या वाघोबाचे दर्शन घेण्यासाठी येतात. यात्रेमध्ये गावातून बाहेर गावी स्थायिक झालेले गावकरीही यात्रेत येऊन यात्रेचा आनंद घेतात. यात्रेमध्ये लहान मुलांची खेळणी,मौत का कुवा,ब्रेक डान्स, रहाट पाळणे याद्वारे बच्चे कंपनीची चांगलीच करमणूक होते.

बोलठाणकरांची यात्रा म्हणजे गरम गरम भजी आणि जिलबी,
यात्रेत आलेले भाविक वाघोबाच दर्शन घेतल्या नंतर गरम भजे व जिलेबी वर ताव मारतात.

बोलठाण च्या वाघोबाचे वैशिष्ट्य म्हणजे वाघ जरी मांसाहारी प्राणी असला तरी या वाघोबाला शुद्ध शाकाहारीच नैवद्य हवा असतो.

आज वाघ हा वन्यप्राणी दुर्मिळ होत आहे . शासन वाघ वाचवण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे.व्याघ्र प्रकल्प राबवित आहे परंतु महाराष्ट्रामध्ये बोलठाण असेही एक गाव आहे या गावामध्ये अशा दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवाची यात्रा भरवून जणूकाही वाघ वाचविण्याचाच संदेश दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *