“सोलापूर आज मोदीमय”

Spread the love

 

सोलापूर येथे आज विविध विकास कामे व देशातील सर्वात मोठा असंघटित कामगारांसाठी चा तीस हजार घरांचा गृहप्रकल्पाचे बांधकामाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले .पारंपारिक पगडी ,तलवार व घोंगडी देऊन मोदींचे स्वागत करण्यात आले . मोदींच्या हस्ते उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी भूमिपूजन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रकल्प लोकार्पण, सोलापूर ते उस्मानाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण, पाणीपुरवठा ड्रेनेज लाईन भूमिपूजन आणि असंघटित कामगारांसाठी तीस हजार घरांचे प्रकल्प भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार नरसय्या आडम, नितीन गडकरी, विजयकुमार देशमुख व मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर लोकांना खरी उत्सुकता होती ती मोदींच्या भाषणाची भारत माता की जय या घोषणेने मोदींनी भाषणाची सुरुवात केल्यानंतर वातावरणात जल्लोष पसरला त्यानंतर मराठी भाषेतून मोदींनी भाषणाचे सुरूवातीला विठ्ठल रुक्मिणी, श्री सिद्धरामेश्वर, तुळजाभवानी माता ,दामाजीपंत यांचे नामस्मरण करून आपले भाषणास सुरुवात केली .

मोदींचे कार्यकाळात साडेचार वर्षात चाळीस हजार किलोमीटर नॅशनल हायवे जोडले गेले याची माहिती दिली ज्या कामाचा शिलान्यास आम्ही केला त्याचे लोकार्पण ही आम्हीच करणार अस विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच सोलापुरातील ३०००० असंघटित कामगारांना त्यांचे घराची चावी देण्यास मीच येणार आहे असा विश्वास त्यांनी कामगारांना दिला. सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वेमार्गाला मोदींनी मंजुरी दिली .काँग्रेस सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले काँग्रेस राजवटीत तेरा लाख घरे बांधण्याचा कागदावर निर्णय झाला त्यापैकी किती घरे बांधली गेली? परंतु भाजप सरकारने ७० लाख शहरी गरीब लोकांना घर बांधण्याचे निर्णय घेतला व चार वर्षात १४ लाख घरे बांधून तयार केली आहेत लवकरच ३० लाख घराचे काम पूर्ण करणार आहोत असा विश्वास व्यक्त केला. मध्यमवर्ग लोकांचे घरासाठी लाभार्थ्यांना सहा लाख रुपये बचतीची योजना लागू केल्याचे सांगितले ,गरीब व असंघटित कामगारांसाठी भाजप सरकारने विमा व पेन्शन योजना असल्याची माहिती मोदींनी दिली. मिशेल मामाचे चौकशीतून काँग्रेस काळातील सर्व घोटाळे सौदेबाजी बाहेर येणार आहे प्रत्येक पैशाचा हिशोब केला जाईल याची ग्वाही त्यांनी दिली .याप्रसंगी मोदींची काही वाक्ये “आपका आशीर्वाद है इसलिये चौकीदार लड रहा है” , “ना खरीद पाओगे ना डरा पावोगे ये मोदी अलग मिट्टी का बना हे “, “चौकीदार न सोता हें बलकी चोरोको पकडणे की ताकत रखता हे” अशा मोदींच्या वाक्यामुळे वातावरण पूर्णपणे मोदीमय होऊन गेले .लोकांनी मोदी मोदी च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. शेवटी भाषणाचा समारोप करताना मराठी व कन्नड भाषेमध्ये बोलून लोकांना मकरसंक्रातीच्या व गड्डा यात्रेच्या शुभेच्छा देऊन आपले भाषण संपवले .याप्रसंगी मंचावर मोदींसह नितीन गडकरी, राज्यपाल विद्यासागर राव, सुभाष देशमुख, मुख्यमंत्री फडणवीस, विजयकुमार देशमुख, खा. बनसोडे ,आडम मास्तर ,चंद्रकांत पाटील, महापौर शोभा बनशेट्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर शहर प्रतिनिधी – विपुल लावंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *