कर्जत नगर परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन 

Spread the love

कर्जत नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शन करत दाखल केलेउमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे एक दिवस राहिल्याने राष्ट्रवादीने बुधवारी राष्ट्रवादीच्या ऍड,प्रतीक्षा लाड यांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज निवडणूक अधिकारी रवींद्र बोंबले यांच्याकडे दाखल केला . आमदार सुरेश लाड यांचीकन्या ऍड,प्रतीक्षा लाड राष्ट्रवादी पक्षासह मनसे, एस आर पी, बी एस पी, झेंडे फडकत होते राष्ट्रवादी भवन दहिवली येथून पूर्ण बाजार पेठेतून ते नगर परिषद येथे शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्यात आले काल शिवसेनेने केलेल्या शक्तिप्रदर्शनाला आज राष्ट्रवादी ने दिलेले प्रतिउत्तर पहाता कर्जत ची निवडणूक रंगतदार ठरणार हे मात्र नक्की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव कर्जत शहर अध्यक्ष शरद लाड यांच्यासह राष्ट्रवादी, मनसे, एस आर पी,बी एस पी,चे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते .

रायगड कर्जत हुन प्रतिनिधी बाळू गुरव म मराठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *