सासर्याने केला सुनेवर बलात्कार !

Spread the love

पोलीसांकडून गुन्हा दाखल करण्यास नकार ; न्यायासाठी पीडीतेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून उपोषण

जालना (जिल्हा प्रतिनिधी )
वर्षभरापुर्वीच लग्न होऊन सासरी नांदायला गेलेल्या 20 वर्षीय विवाहितेवर तिच्या सास-याची नियत फिरली आणि त्या वासनांध सास-याने सुनेवरच बलात्कार केल्याची अत्यंत घृणास्पद घटना जालना शहरात समोर आली आहे. दरम्यान, पीडीत विवाहितेने या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता ,पोलीसांनी महिलेला अपमानास्पद वागणूक देत हाकलून दिले. त्यामुळे पीडीतेने दि.25 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
शहरातील अंबड रोड परिसरातील जगदेश्वर नगरात राहणारे रवी दिलीप कोरडे यांच्याशी दि.18 फेब्रुवारी 2018 रोजी विवाह झालेल्या 20 वर्षीय विवाहितेवर तिचे सासरे दिलीप दौलतराव कोरडे यांची सुरूवातीपासूनच वाईट नजर होती. त्यातच सदर विवाहितेचा पती एका कंपनीत कामाला जायचा. सासू देखील शेतामध्ये कामाला जात आणि दिर सुद्धा कामानिमित्त बाहेर राहत. विवाहिता घरकाम करीत.तिचे सासरे दिलीप दिवसभर घरीच राहत . या संधीचा गैरफायदा घेत सासरे दिलीप कोरडे यांनी सुनेची वारंवार छेडछाड करून विनयभंग केला. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात एका दिवशी दिलीप याने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.तसेच चटके देखील दिले, असे सदर विवाहितेने दि. 19 ऑक्टोबर 2018 रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, सासर्याकडून करण्यात आलेल्या अत्याचाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची व पतीकडून घटस्फ़ोट देण्याची सासरा दिलीप कोरडे याने दिल्यामुळे पीडितेने अत्याचार सहन केला. घडलेला प्रकार पीडीतेने आईला सांगितल्यानंतर पीडीनेने सासरे दिलीप यांच्या विरूद्ध तालुका जालना पोलीस ठाण्यात दि.25 नोव्हेंबर 2018 रोजी तक्रार दिली. मात्र पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी पीडीतेची दिशाभूल करीत केवळ घरगुती भांडणाचे रूप देऊन एनसी दाखल केली आणि पीडीतेला महिला तक्रार निवारण केंद्रात पाठवले. महिला तक्रार निवारण केंद्रात पीडीतेचा पती रवी कोरडे याने पत्नीचा विनयभंग झाल्याचे मान्य केले. यानंतर पीडीता पुन्हा तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलीसांनी पीडीतेला कुटुंबियासह पोलीस ठाण्यातून हाकलून दिले , असे पीडीतेने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडीतेने विशेष पोलीस महा निरीक्षक यांनाही तक्रार दिली असूनही दखल घेतली जात नसल्याने पीडीतेने दि. 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात सामाजिक कार्यकर्त्या दिव्या पाटील यांनी सहभागी होऊन पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांनी त्यांना अडविले.दरम्यान रविवारी ता.27 रोजीही दिव्या पाटील यांनी पीडीतेसह उपोषण सुरू ठेवले होते. अत्याचार पीडीत विवाहितेच्या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तीन दिवसांपासून पीडीतेचे उपोषण सुरूच आहे.
दरम्यान
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्यायासाठी उपोषण करणा-या पीडीतेची रविवारी ता. 27 रोजी अखिल भारतीय सेनेच्या जालना शहराध्यक्षा नंदा पवार , जिल्हा संपर्क प्रमुख गणेश चांदोडे यांनी भेट घेतली. पीडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणार असल्याचेही यावेळी नंदा पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *