रामटेक भंडारा खात राज्य मार्ग ठरत आहे अपघाताला कारण

Spread the love

रस्त्याच्या कामा मुळे शाळकरी मुलांना दुखापत, तर अपघाला मिळत आहे आमंत्रण,

नागपूर जिल्ह्यातील रामटेक भंडारा राज्य मार्गाचे सिमेंट कांक्रेट करणाचे काम मागील काही महिन्या पासून सुरू आहे, मात्र चुकीचे नियोजन आणि कामात होत असलेल्या दिरंगाई मुळे अरोली येथील बस स्टँड परिसरात अपघाताला आयते आमंत्रण मिळत असून अपघाताचे प्रमाण वाढत आहे,

HG इन्फ्रा कम्पनी द्वारे मागील काही महिन्या पासून रामटेक ते भंडारा रस्त्याचे दुपदरी करणाचे काम सुरू आहे,
सध्या हे काम अरोली येते सुरू असून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला कपंणीने ड्रेनेज चा खड्डा तसाच उघडा ठेवल्याने त्यात शाळकरी मुले आणि येणारे जाणारे पादचारी पडत असल्याने त्यांना गंभीर दुखापत होत आहे, तर या कँपणीने शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था केल्याने शेतकऱ्यांना सुद्धा मनस्ताप सहन करावा लागत आहे, तर रस्त्याच्या कडेला असलेल्या पादचारी वर कुजलेल्या पोत्यावर तशीच गिट्टी टाकण्यात येत आहे,

अरोली येथील गावकऱ्यांनी या विषयी संबंधित कम्पनी च्या कंत्राट दाराला विचारले असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने गावकरी नाराज असून आंदोलनाचा इशारा दिला आहे, बाइट ग्रामस्थ आरोली

प्रतिनिधि शैलेश रोशनखेड़े

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *