पराभव स्वीकारून भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : सुरेश लाड

Spread the love

कर्जत पालिका निवडणुकीच्या मतमोतजणीत कर्जतकरांनी महायुतीला बहुमताचा कौल दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर असल्याने झालेला पराभव मी स्वीकारत आहे. तसेच जरी या पालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी भविष्यात कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे सहकारी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन आमदार सुरेश लाड यांनी केले. कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची पत्रकार परिषदे घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
आमदार लाड पुढे म्हणाले मागील पत्रकार परिषदेत मी म्हणालो होतो विजयी उमेदवारांना घेऊन मी 28 तारखेला तुम्हा पत्रकारांना भेटेल. मात्र आज निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर जनतेने महायुतीला बहुमत देत कौल दिला आहे. जनतेच्या मताचा आदर करत महायुतीच्या थेट नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांना व त्यांच्या 10 सहकाऱ्यांना त्यांच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा देतो असेही लाड म्हणाले. आम्ही 10 वर्ष सत्तेत होतो कर्जतकरांसाठी विकासात्मक दृष्ट्या प्रामाणिक काम केले. कर्जतकरांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. जनतेने महायुतीला बहुमताचा कौल दिला आहे. पराभवामुळे नक्कीच आम्ही आत्मपरीक्षण करू. आघाडीसाठी शेकाप आणि काँग्रेस सोबत चर्चा केली होती परंतु ती निष्फळ ठरली. मात्र सत्तेत नसलो तरी जनसामान्यांची कामे कायम करत आलो आहे आणि करत राहणार आहे. असे देखील आमदार लाड यांनी स्पष्ट केले.

रायगड कर्जत हुन प्रतिनिधी बाळू गुरव म मराठी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *