मिरारोड:- मिरागाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला लागली आग…जीवित हानी नाही.

Spread the love

मीरा भाईंदर
महेंद्र वानखेडे
प्रतिनिधी

मिरारोड:- मिरारोड भागातील प्लेझेंट पार्क परिसरातील रोड लागत असलेल्या फर्निचरच्या दुकानाला दुपारी दिड पावणे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. मीरा भाईंदर अग्नीक्षमकच्या चार ते पाच बंब घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयन्त सुरू झाले, आणि आग पूर्ण पणे विजवण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर जाळून खाक झाले आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. नक्की आग लागली कशी पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *