विवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का – धनंजय मुंडे

Posted 6 months ago by admin
384 views

नाव न घेता पंकजा मुंडेंवर टीकाणची वर्षा…….

परळी-बीड-सुकेशनी नाईकवाडे:–

परळी शहरात रास्ट्रवादी पार्टी च्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा हालगे गार्डन येथे आयोजित करणयात आला होता,या मेळाव्यात पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जमा होते . यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना 23 च्या सभेबद्दल सूचना केल्या .
नाव न घेता पंकजा मुंडेंवर टिका करत धनंजय मुंडे म्हणाले की, सामोहिक विवाह सोहळ्यात कोणाला आणावे याची तरी अक्कल आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री हे साहजिक आहे परंतु फिल्मी हिरो आणणे हे योग्य आहे का? हे आपणच ठरवा अशी टीका पंकजा मुंडेंवर केली.
दरम्यान आज या सभेत धनंजय मुंडे म्हणाले की, विवाह सोहळ्यात कोणाला आणावे हे त्यांना कळत नाही.

केंद्राची सत्ता असतानाही ज्यांना परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचा केंद्राच्या बारा ज्योतिर्लिंगाच्या यादीत समावेश करता आला नाही, साधी परळी – मुंबई रेल्वे सुरू करता आली नाही, त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत, असे सुनावतानाच चिक्की खाण्याएवढे राष्ट्रवादी कॉंग्रेसला संपवणे सोपे वाटले का? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्याच्या खासदार यांच्या बद्धल सध्या बीजेपीच्या सोसिएल मेडिया मार्फत असा प्रचार करणे सुरू आहे की, प्रधान मंत्री नरेंद्र मोदी च्या नंतर बीजेपी पक्षात दुसऱ्या स्थानावर्ती बीड च्या खासदार असून त्यांच्या पुढे बीजेपी चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे देखील फिके आहेत. अशी वातावरण निर्मिती केली जात असल्याची टीका यावेळी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी केली.
पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, नगर रेल्वे केंव्हा सुरू होणार. नुसते सेल्फी दाखवून मला सिने स्टाईल अजय देवगण यांचा पिच्चर फुल और काटे याची आठवण काढत म्हणाले की, जशी त्यात दोन मोटार सायकल वर दोन्ही पाय ठेऊन त्याचा शो दाखवला तसा शो परळी शहराच्या ताईसाहेब यांनी पटरी भ्रमण करताना दाखवला असे ही धनंजय मुंडे यांनी या वेळी बोलताना सांगितले. तसेच बीड नगरच्या रेल्वेने येऊन निवडणुकीचा प्रचार करणार होत्या, त्याचे काय झाले?
जसजस्या लोकसभेच्या निवडणूक जवळ जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे आरोप व प्रति आरोपाच्या धमाक्याने जोर पकडला असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
दरम्यान 23 च्या सभेत सर्व कार्यकर्ते सह पदाधिकाऱ्यांनीं उपस्थित राहण्याचेही आवाहन केले.

You may also like

रणरागिणी झाशीची राणी च्या कोट या सासरी पाचवे ग्रामीण संमेलन संपन्न झाले
Posted 7 months ago by admin

रणरागिणी झाशीची राणी चे स्मारक कोट येथे व्हावे यासाठी अनेक वर्ष [...]
199 views

कळंबोलीतील कॅप्टन बार वर पोलीस उपायुक्तांची धाड – पन्नास बारबालेसह ग्राहकांना अटक
Posted 7 months ago by admin

कळंबोली तील गेल्या कित्येक महिन्यापासून वादात असलेल्या कॅप्टन बार वर [...]
318 views

अहमदनगर : गुजरात मधील चौघांना लुटणारी टोळी जेरबंद
Posted 7 months ago by admin

स्वतात सोन्याचे आमिष दाखवून गुजरात मधील चौघांना लुटणारी टोळी जेरबंद [...]
30 views

अबब,चोरांची कमाल,माळीवाडगाव परिसरात चोरटे नेतायेत जनावरे “क्रूझर” जीप मध्ये चोरून…..
Posted 7 months ago by admin

गुलाब वाघ ,गंगापूर तालुका प्रतिनिधी गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव [...]
306 views

देवगडमध्ये संपन्न होणाऱ्या सिंधुदूर्ग फ्लिम फेस्टिवल सणात सर्वांनी सहभागी व्हा – सुमित पाटील
Posted 7 months ago by admin

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड मध्ये सिंधुदुर्ग नॅशनल [...]
26 views

देसाईगंज येथे युवा जनशक्ति संगठनेची स्थापना … सामाजिक शेत्रात करणार काम .
Posted 7 months ago by admin

देसाईगंज .... गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा या ठिकाणी युवा [...]
111 views

कामठी तालुका मराठी पत्रकार संघातर्फे अखिल भारतीय हास्य कवि संमेलनाचे आयोजन.
Posted 7 months ago by admin

नितीन रावेकर कामठी प्रतिनिधी कामठी-कामठी तालुका मराठी पत्रकार संघ [...]
39 views
Page 1 of 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *